ऋत्विक चव्हाणची नॅशनल हॉकी संघात निवड

Foto
फुलंब्री, (प्रतिनिधी) : तालुक्यातील निधोना येथिल ऋत्विक चव्हाण खुलताबाद येथील डॉ. बी. बी. चव्हाण मिलिटरी स्कूलचा कॅडेट असून नॅशनल हॉकी संघात निवड झाली आहे. ऋत्विकने सातत्यपूर्ण मेहनत, शिस्तबद्ध, सराव आणि उत्कृष्ट खेळाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. नॅशनल हॉकी संघाचे निवड शिबिर १६ डिसेंबर पासून बुलढाणा येथे सुरू आहे.

सून, या शिबिरात देशभरातून निवड झालेल्या गुणवंत खेळाडूंना मार्गदर्शन दिले जात आहे. या
शिबिरात ऋत्विक आपली खेळ कौशल्ये सादर करणार आहे. ऋत्विकच्या या यशाबद्दल शाळेचे संचालक डॉ. वाकळे, प्राचार्य, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक तसेच सर्व शिक्षकवृंद व कर्मचारीऱ्यांनी
त्याचे अभिनंदन केले आहे.

शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील उज्वल परंपरेत ऋत्विकने मानाचा तुरा खोवला असून, भविष्यात तो राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. शाळेकडून त्याला क्रीडा प्रशिक्षक किशन चव्हाण, गणेश काळे आणि गणेश गौतम यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडीमुळे निधोना या गावातही उत्साहाचे वातावरण झाले. ऋत्विकसह वडील डॉ. वैभव चव्हाण यांचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.